मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याची पाण्याची ७ लाखाची थकबाकी
मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानाचे साडे सात लाखाचे पाण्याचे बिल थकले असल्याने मुंबई महापालिकेने वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत टाकला आहे. मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची ८ कोटी रूपयांची पाणी बिले थकली असल्याची बाब माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मागितलेल्या माहितीमुळे पुढे आली आहे.
सामान्य मुंबईकराने जर दोन ते तीन महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी भरली नाही तर बृहन्मुंबई महानगरपालिका त्यांची जलजोडणी खंडित करते, परंतु महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांवर महेरबान झाल्याचे स्पष्ट झाले आहे मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मांगावली होती. सदर माहिती संदर्भात जन माहिती अधिकरी तथा कार्यकारी अभियंता जलमापके (महसूल) यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिलेली आहे.यामाहितीत मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी आहे.
मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थांनांची पाण्याची थकबाकी असून, त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (वर्षा बंगला), वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (देवगिरी), शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, (सेवासदन), गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता (पर्णकुटी), ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (रॉयलस्टोन), आदिवासी मंत्री विष्णू सावरा (सागर), अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्ये मंत्री गिरीश बापट (ज्ञानेश्वरी), वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (शिवनेरी), परिवहन मंत्री दिवाकर रावते (मेघदूत), उद्योगमंत्री सुभाष देसाई (पुरातन), पर्यावरण मंत्री रामदास कदम (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (जेतवन), सार्जनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत (चित्रकुट), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले (सातपुडा), पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर (मुक्तागीरी), एकनाथ खडसे (रामटेक), मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी तोरणा, रामराजा निंबाळकर, विधानसभा सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृह, नावे आहेत.
कोणत्या मंत्र्यांच्या बंगल्यावर किती पाण्याची थकबाकी
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, (वर्षा) – एकूण थकबाकी रु. 744981
सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री,(देवगिरी) – एकूण थकबाकी 145055
विनोद तावडे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री (सेवासदन) -एकूण थकबाकी रु. 161719
पंकजा मुंडे, ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री,(रॉयलस्टोन)-एकूण थकबाकी 35033
विष्णू सावरा, माजी आदिवासी मंत्री (सागर) -एकूण थकबाकी 182141
गिरीश बापट,माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री ( ज्ञानेश्वरी)-एकूण थकबाकी रु. 2023
परिवहन मंत्री दिवाकर रावते,(मेघदूत) -एकूण थकबाकी रु. 105484
सुभाष देसाई, उद्योगमंत्री ( पुरातन) -एकूण थकबाकी 249243/-*
रामदास कदम, पर्यावरण मंत्री,(शिवगिरी) -एकूण थकबाकी रु. 8988
एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री (नंदनवन) -एकूण थकबाकी रु. 228424
चंद्रशेखर बावनकुळे, ऊर्जामंत्री,(जेतवन) -एकूण थकबाकी 614854
डॉ. दीपक सावंत, माजी सार्जनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री,(चित्रकुट) -एकूण थकबाकी रु.155852
राजकुमार बडोले, माजी मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री,(सातपुडा) -एकूण थकबाकी रु. 106296
महादेव जानकर, पशुसंवर्धन मंत्री,(मुक्तागीरी) -एकूण थकबाकी रु.173497
एकनाथ खडसे, माजी मंत्री (रामटेक) -एकूण थकबाकी रु.218998
मुख्यमंत्र्यांचे सुरक्षारक्षक (तोरणा) एकूण थकबाकी रु.10682
रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभा सभापती ( अजंठा)- एकूण थकबाकी रु.1204390