संजय दत्त म्हणतात प्रवेश करणार नाही तर जानकर म्हणाले जरा थांबा !

संजय दत्त म्हणतात प्रवेश करणार नाही तर जानकर म्हणाले जरा थांबा !

मुंबई नगरी टीम

मुंबई : अभिनेता संजय दत्त यांनी राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त फेटाळे आहे. तर संजय दत्त सध्या  चित्रपट निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय समाज पक्षामध्ये  प्रवेश करण्यास अजून वेळ असल्याची माहिती रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली.

 काल शिवाजी पार्कवर झालेल्या रासपच्या मेळाव्यात अभिनेता संजय दत्त यांनी मंत्री महादेव जानकर यांना निवडणुकांसाठी शुभेच्छा देत  व्हिडिओद्वारे महादेव जानकर हे माझे बंधू असल्याचे सांगितले. त्यानंतर, महादेव जानकर यांनी संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हटले होते. मात्र संजय दत्त यांनी हे वृत्त फेटाळले आहे. चित्रपट अभिनेते संजय दत्त हे मित्र व भावासारखे आहेत. सध्या ते चित्रपट निर्मितीमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय समाज पक्षामध्ये  प्रवेश करण्यास अजून वेळ असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली. मात्र ते राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous articleराज्य सरकार फक्त घोषणा करण्यात पटाईत
Next articleसरकारचा मोठा निर्णय : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांवरील कर्ज माफ