म्हणून काल पवार साहेबांसोबत नव्हतो  : अजितदादा

म्हणून काल पवार साहेबांसोबत नव्हतो  : अजितदादा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.त्या घटनेवेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक नेते हजर होते मात्र  अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवल्याने अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. त्यांनी आज  सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयाला राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार भेट देणार असताना आपण त्यांच्यासोबत मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी उपस्थित का नव्हतो यासंदर्भात अजितदादांनी स्पष्टीकरण दिले.

शिखर बँक प्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मात्र पवार हे काल ईडीच्या कार्यालयात जावून अधिका-यांना भेटणार होते. त्यामुळे मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या निवासस्थानी अनेक घटना घडत असताना मात्र या ठिकाणी कुठेत अजित पवार दिसत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी याबाबत खुलासा केला.मी मुंबईला येण्यासाठी मी निघालो होतो मात्र मला वेळेत पोहचता आले नाही. पुण्यात बारामतीत परवा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे बारामतीमध्ये पूरपरस्थिती निर्माण जाली होती. त्यामुळे तेथील व्यवस्था पाहण्यासाठी मी बारामतीमध्ये होतो. नंतर मी मुंबईला येण्यास निघालो. मात्र मला खूप उशीर झाल्याने पुण्यात मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी पुण्यामधून निघालो. मात्र पुण्याहून मुंबईला निघाल्यानंतर दोन्ही टोल नाक्यावर  वाहनांच्या मोठ्या रांगा होत्या. त्यामुळे मला मुंबईत यायला दोन तास लागले, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. साहेब  जिथे जिथे जातील तिथे अजित पवार कायमच साथ द्यायला त्यांच्या सोबत असतील,असेही ते म्हणाले.

Previous articleआणि ….अजित पवार यांना अश्रू अनावर झाले !
Next articleकाँग्रेसच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर;वाचा कोणाला लागली लाॅटरी