५४.५ टक्के जनतेला नवा मुख्यमंत्री हवाय !
मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्या शनिवारी संपत असून, २१ ऑक्टोबरला मतदान होणार असून २४ ऑक्टोबरला निकाल स्पष्ट होईल.त्यापूर्वी एका वृत्त वाहिनीने घेतलेल्या निवडणूक पूर्व अंदाजात राज्यातील ५४.५ टक्के जनतेला राज्यातील विद्यमान मुख्यमंत्र्यांमध्ये बदल हवा आहे. तर ५५ टक्के जनता राज्यातले सरकार तातडीने बदलू इच्छित असल्याचे स्पष्ट झाले आहे.या अंदाजात भाजप १३४,शिवसेना ६०, काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ४२ तर इतरांना ८ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणूकीचा प्रचारा उद्या शनिवारी संपत आहे. त्यापूर्वी एका वृत्त वाहिनीने आज निवडणूक पुर्व अंदाज व्यक्त केले आहेत.मात्र या वृत्त वाहिनीने आणि सी वोटर यांनी घेतलेल्या जनमत चाचणीत राज्यातील ३७.७ टक्के जनतेला मुख्यमंत्रीपदावर पुन्हा देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी राज्यातील ५४.५ टक्के जनतेला राज्यातील विद्यमान मुख्यमंत्र्यांमध्ये बदल हवा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आजच्या अंदाजानुसार महायुतीला १९४ जागा (भाजप १३४ + शिवसेना ६०) तर महाआघाडीला ८६ (काँग्रेस ४४ + राष्ट्रवादी ४२), इतर पक्ष आणि अपक्षांना केवळ ८ जागा मिळतील मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ४८.८ टक्के जनतेने भाजपची सत्ता येईल या बाजूने कल दिला आहे. तर शिवसेनेला ९ टक्के , काँग्रेसला १०.६ टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला ११.३ टक्के, इतर ११.३ टक्के असा कल या चाचणीत देण्यात आला आहे.
सध्याचे मुख्यमंत्री तातडीने बदलावे का ?
होय – ५४.५ टक्के
नाही – ४४.७ टक्के
माहित नाही – ०.८ टक्के
सरकार तातडीने बदलायचे आहे का?
होय – ५५ टक्के
नाही – ४४.६ टक्के
माहित नाही – ०.४ टक्के
कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील?
भाजप – १३४
शिवसेना – ६०
काँग्रेस – ४४
राष्ट्रवादी – ४२
इतर – ८
मुख्यमंत्रीपदासाठी पसंती कोणाला ?
देवेंद फडणवीस – ३७.७ टक्के
अजित पवार – ७.६ टक्के
शरद पवार – ६.८ टक्के
राज ठाकरे – ६ टक्के
नितीन गडकरी – ५.९ टक्के
उद्धव ठाकरे – ५.१ टक्के
अशोक चव्हाण – ४.१ टक्के
पृथ्वीराज चव्हाण – ३.५ टक्के
इतर – २०.२ टक्के
सांगता येत नाही – ६.१ टक्के