अगोदर संजय काकडेंनी एका पक्षात स्थिर राहावे

अगोदर संजय काकडेंनी एका पक्षात स्थिर राहावे

मुंबई नगरी टीम

मुंबई: शिवसेनेच्या ५६ पैकी ४५ आमदार आमच्या संपर्कात आहेत,असा दावा करणा-या खासदार संजय  काकडे याच्या वक्तव्याचा समाचार रत्नागिरीचे  शिवसेना आमदार उदय सामंत यांनी घेतला आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील आणि आपल्याला टेंडर मिळतील या आशेने त्यांना खुश करण्यासाठी  वक्तव्य करणा-या संजय काकडे स्वतः एका पक्षात स्थिर राहावे असा टोला आ. उदय सामंत यांनी लगावला आहे .

विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपात रस्सीखेच सुरू असतानाच आपल्या वक्तव्यामुळे नेहमीच भाजपाला अडतणीत आणणारे पुण्यातील भाजपाचे राज्यसभा सदस्य संजय काकडे यांनी वक्तव्य करून शिवसेना भाजपातील सलोखा बिघडविण्याचे काम केल्याची चर्चा आहे.१०५ जागांवर विजय मिळवून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेला ५६ जागांवर विजय मिळवता आला आहे. दोन्ही पक्षांना अपक्ष आमदार पाठिंबा देत असतानाच शिवसेनेच्या ५६ पैकी ४५ आमदार आमच्या संपर्कात आहेत, असा दावा काकडे यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असतानाच रत्नागिरीचे शिवसेना आमदार उदय सामंत यांनी काकडे यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे.देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यामंत्री होतील आणि आपल्याला टेंडर मिळतील या आशेने त्यांना खुश ठेवण्यासाठी संजय काकडे यांनी हे वक्तव्य केले असून, काकडे यांनी प्रथम एका पक्षात स्थिर राहावे असा टोला आ. उदय सामंत यांनी लगावला आहे.शिवसेनेचे आमदार काकडेंनी बोलण्याएवढे कमजोर नाहीत.आमची निष्ठा बाळासाहेबांच्या विचारावर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर असून शिवसेनेच्या आमदारांच्या निष्ठेवर बोलून काकडेंनी स्वतःची राजकीय अपरिपक्वता सिद्ध केली असल्याची टीका आ. सामंत यांनी केली.

 

Previous articleशिवसेना भाजपात मुख्यंमंत्रीपदावरून ठिणगी
Next articleदेवेंद्र फडणवीस …..पुन्हा !