देवेंद्र फडणवीस …..पुन्हा !

देवेंद्र फडणवीस …..पुन्हा !

मुंबई नगरी टीम

मुंबई : देवेंद्र फडणवीस हे राज्याचे दुस-यांदा मुख्यमंत्री होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.भाजप पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी अपेक्षेप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. १९९५ पासून कुठल्याही पक्षाला ७५ पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत. राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचे सांगून अफवांवर विश्वास ठेवू नका.पुढील पाच वर्षात राज्य दुष्काळ मुक्त करणार असल्याचे त्यांनी नेतेपदी निवड  झाल्यानंतर सांगितले.

शिवसेना मुख्यमंत्रीपदावर अडून असेल तरी आज भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक विधानमंडळ पार पडली. या बैठकीत भाजपाच्या पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली.प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचा प्रस्ताव मांडला..गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी सक्षमपणे कारभार सांभाळला. गेल्या पाच वर्षात सत्तेत असताना त्यांनी अनेक प्रश्न सोडवले आहेत. त्यामुळे त्यांच्याशिवाय कोणाचेही नाव पुढे येऊ शकत नाही असे पाटील यांनी प्रस्ताव मांडताना सांगितले. या प्रस्तावाला भाजपाचे केंद्रीय निरिक्षक नरेंद्र सिंह तोमर, सुधीर मुनगंटीवार, हरिभाऊ बागडे, राधाकृष्ण विखे, गणेश नाईक, संजय कुटे, देवयानी फरांदे, देवराव भोईर, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले  यांनी अनुमोदन दिले.

गेल्या पाच वर्षात छत्रपती शिवाजी मंहाराजांचे सेवक म्हणून काम केले.यापुढे रयतेचे राज्य चालवणार आहोत.महाराजांनी जी माणकं दिली आणि डॅां.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार युतीचे सरकार चालवणार असल्याचे फडणवीस यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर सांगितले.गेल्या पाच वर्षात दीनदलित, गोरगरीब, मराठा समाज प्रत्येक समाजाच्या आशा, अपेक्षा आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. काही बाकी राहील असेल तर ते पूर्ण करण्याची ताकत आपल्यात आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करु शकलो हे आपले यश असल्याचे फडणवीस म्हणाले. १९९५ पासून कुठल्याही पक्षाला ७५ पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपाला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. हा महायुतीला मिळालेला कौल आहे असे ते म्हणाले.राज्यात महायुतीचेच सरकार स्थापन होणार असल्याने अफवांवर विश्वास ठेवू नका, पुढील पाच वर्षात राज्य दुष्काळमुक्त करणार असून वाहून जाणारे पाणी  शेतीपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षात अपेक्षा आकांशा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. काही बाकी राहील्या असतील तर त्या पूर्ण करण्याची ताकत आपल्यात आहे हा विश्वास जनतेच्या मनात निर्माण करु शकलो हे आपले यश असल्याचे फडणवीस म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.

Previous articleअगोदर संजय काकडेंनी एका पक्षात स्थिर राहावे
Next articleशिवसेनेला सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा