शिवसेनेला सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा

शिवसेनेला सहा अपक्ष आमदारांचा पाठिंबा

मुंबई नगरी टीम

मुंबई : एकीकडे भाजपाच्या विधिमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होत असतानाच मुख्यमंत्रीपदावर दावा केलेल्या शिवसेनेचे संख्याबळ वाढले आहे. आज धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेवून शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६२ वर पोहोचले आहे.

समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू असून, शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष अपक्ष आमदारांना आपापल्या गोटात खेचत आहेत. शिवसेनेला आज एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा मिळाला आहे.धुळे जिल्ह्यातील साक्रीच्या अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. आज मंजुळा गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेवून शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ ६२ वर पोहोचले आहे.धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष मंजुळा गावित विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपाचे उमेदवार मोहन सूर्यवंशी यांचा पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने ५६ जागांवर विजय मिळवला आहे. त्यानंतर अपक्ष आमदार बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. अहमदनगरमधील नेवासा मतदारसंघातील आमदार शंकरराव गडाख यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल व भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे.

Previous articleदेवेंद्र फडणवीस …..पुन्हा !
Next articleराष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार