सरकारला पाठिंबा असतानाही माजी मंत्री बच्चू कडूंचा मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांना दणका ! घेतला मोठा निर्णय

मुंबई नगरी टीम

अमरावती । राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारला पाठिंबा दिलेले प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांना पहिल्या विस्तारात स्थान न मिळाल्याने ते कमालीचे नाराज आहेत.त्यांनी आपली नाराजी उघड उघड बोलून दाखवली आहे.अशातच आता त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.आगामी होणा-या विधान परिषदेच्या पाचही जागा प्रहार संघटनेच्यावतीने लढविण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

३० जानेवारीला राज्यात होणाऱ्या पाच विभागीय पदवीधर-शिक्षक मतदारसंघात निवडणुका होत आहेत.या पाचही जागांवर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.या पाच विभागीय पदवीधर-शिक्षक मतदारसंघासाठी प्रहार संघटनेने उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. मराठवाड्यातून शिक्षक मतदारसंघातून डॉ. संजय तायडे,किरण चौधरी,अमरावती मधून नरेश शंकर कौंडा, कोकण,अतुल रायकर नागपूर विभागातून तर सुभाष झगडे हे नाशिक विभागातून निवडणूक लढणार आहेत. या ५ मतदार संघापैकी किमान दोन जागांवर प्रहार संघटनेचे उमेदवार विजयी होतील असा दावा बच्चू कडू यांनी केला.आम्ही या मतदारसंघात गेल्या ३ वर्षापासून मेहनत घेत आहेत.याची कल्पना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांना दिली होती. त्यामुळे आम्हाला विचारात घेऊन उमेदवार द्यावेत त्यामुळे तिन्ही पक्षांची युती होवू शकेल.मात्र याबाबत त्यांचा कोणताही निरोप आला नसल्याने आम्ही पाचही विभागात उमेदवार उभा करण्याचा निर्णय आम्ही घेतला असल्याचे कडू यांनी स्पष्ट केले.अर्ज दाखल केल्यानंतर पुढे काही चर्चा होवून निर्णय झाला तर ठिक अन्यथा आम्ही सगळ्या जागा लढण्यावर आम्ही ठाम आहोत असेही त्यांनी सांगितले.शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून नाशिक,अमरावती पदवीधर, औरंगाबाद,नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे.

Previous articleवीज कंपन्याचे खाजगीकरण नाही ; उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे वीज कर्मचा-यांचा संप मागे
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे लोकल गाडी, हात दाखवा गाडी थांबवा !