शरद पवार म्हणाले …अजितदादा मुंबईतच

शरद पवार म्हणाले …अजितदादा मुंबईतच

मुंबई नगरी टीम

मुंबई :  राज्यात नव्या समीकरणाची जुळवाजुळव करण्यास सुरूवात झाली असतानाच आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक होणार होती मात्र ती रद्द करण्यात आल्याने राष्ट्रवादीचे नेते अजित पवार राष्ट्रवादीची बैठक संपल्यानंतर अचानक निघून गेल्याने अनेक चर्चांना ऊत आला होता मात्र अजित पवार मुंबईतच आहेत असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले. बारामतीला जातो हे वक्तव्य त्यांनी चेष्टेने केले असावे असेही त्यांनी सांगून यावर पडदा टाकण्याच प्रयत्न केला.

राज्यात भाजपाला बाजूला ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी नवी समीकरणे अस्तित्वात येत आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वय समितीची बैठक होणार होती. मात्र राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर समन्वय समितीला न जाता मी बारामतीला चाललो असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितल्याने अनेक तर्कवितर्क  लढविले जात होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना ऊत आला. त्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना हस्तक्षेप करावा लागला. बैठकीतुन बाहेर येवून शरद पवार यांनी आपले स्पष्टीकरण दिले. त्यांनी माध्यमामध्ये देण्यात येणा-या बातम्यांबाबत नाराजीही व्यक्त केली.अजितदादा बारामतीला वगैरे गेले नाहीत ते मुंबई मध्येच आहेत. उद्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक असल्याने ते मुंबई मध्येच असल्याचे त्यांनी सांगितले. बारामतीला जातो हे वक्तव्य त्यांनी चेष्टेने केले असावे असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleआम्ही सरकार स्थापन करण्यास तयार होतो मात्र शिवसेनेनी साथ सोडली
Next articleपाच दिवसांत “द रिट्रीट” हॉटेलमध्ये काय घडले!