पाच दिवसांत “द रिट्रीट” हॉटेलमध्ये काय घडले!

पाच दिवसांत “द रिट्रीट” हॉटेलमध्ये काय घडले!

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षानी टोकाची भूमिका घेतल्यामुळे खबरदारी म्हणून शिवसेनेच्या आमदारांना मालाडच्या द रिट्रीट या पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. राज्यात सत्तापेच शिगेला पोहोचला असतानाच गेल्या पाच दिवसात शिवसेनेचे आमदार मात्र कोणत्याही दडपणाखाली नव्हते.

शिवसेना भाजपामधील मुख्यमंत्रीपदाचा वाद मिटण्याची चिन्हे दिसत नसल्याने खबरदारी म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना मालाडच्या द रिट्रीट या पंचतारांकित हॉटेलमध्ये हलविण्याच्या निर्णय घेतला. गेल्या पाच दिवसामध्ये राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथ झाली. गेल्या आठवड्यामध्ये मालाड येथील द रिट्रीट या हॉटेलला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले होते. या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांसाठी एकूण ८० खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. प्रत्येक आमदाराला स्वतंत्र खोली देण्यात आली होती. त्यामध्ये शिवसेनेला पाठिंबा देणा-या अपक्ष आमदारांसाठी दोन खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या.या खोल्या वाटपाची जबाबदारी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, आ. सुनील प्रभू , आ.प्रवीण महाले आणि पप्पू सावंत यांच्यावर सोपविण्यात आली होती.त्यानुसार त्यांनी सर्व आमदारांची व्यवस्थित पार पाडली .

पहिल्या दिवशी सर्व आमदारांनी या हॉटेल मधिल भोजनाचा आस्वाद घ्यावा लागला पण हाँटेलमधिल जेवण एकाही आमदाराला न आवडल्याने आमदारांच्या जेवणाची जबाबदारी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी उचलली आणि मग पुढील चार दिवस या आमदारांनी स्वादिष्ट शाहाकारी जेवणापासून चमचमीत मांसाहारी जेवणावर ताव मारला. आमदारांसोबतच त्यांचे स्वीय सहायक, अंगरक्षक यांनाही या भोजनाचा आस्वाद घेतला.पाच दिवसांच्या या हाँटेलमधिल मुक्कामात या सर्वांचे जिभेचे चोचले आमदार उदय सामंत यांनी एक सहकारी म्हणून पुरवले . स्वादिष्ट भोजनानंतर शिवसेना आमदारासाठी मनोरंजनाची सोय करण्यात आली.यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला.

या पाच दिवसात आमदार सूचना देणे, त्यांच्या हजेरीवर सह्या घेणे हे यांची जबाबदारी आमदार सुनील प्रभू प्रभूंनी यांच्यावर सोपविण्यात आली होती.या पाच दिवसात या हाँटेलमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा भेट देवून आमदारांना मार्गदर्शन केले. त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद ही घेतली. विशेष म्हणजे स्वतः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिवस येथेच आमदार म्हणून मुक्काम केला आणि आमदारांशी संवाद साधला. पाच दिवसांच्या सर्व नियोजनात गटनेते एकनाथ शिंदे , आ.रामदास कदम , खा.अनिल देसाई हे लक्ष ठेऊन होते. राज्यातील नविन समीकरणावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर काल शेवटी रात्री आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाण्याची परवानगी देण्यात आली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रतोद सुनील प्रभू , उपनेते उदय सामंत , प्रताप सरनाईक आणि त्यांच्या सहकार्यांनी द रिट्रीट मधील पाच दिवसांचा आमदारांचा मुक्काम सुलभ करण्यासाठी हातभार लावला.

Previous articleशरद पवार म्हणाले …अजितदादा मुंबईतच
Next articleशेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शरद पवार ” शेताच्या बांधावर”