शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शरद पवार ” शेताच्या बांधावर”

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शरद पवार ” शेताच्या बांधावर”

मुंबई ‌नगरी टीम

नागपूर : राज्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीनंतर सरकारकडून काहीच मदत मिळाली नाही.तर कोणी पाहणी करायला आले नाही आणि पिकाला भाव सुद्धा नाही अशा व्यथा हवालदिल झालेल्या काटोल येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर आज मांडल्या.

नागपूरमधील काटोल येथील ओल्या दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान चारगाव येथील शेतकऱ्यांच्या बांधावर आज शरद पवार यांनी भेट दिली. पवार हे आज विदर्भातील नागपूर दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी काटोल विधानसभा क्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.सत्ता स्थापन होणार की नाही या विवंचनेत अख्खा महाराष्ट्र असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार शेतकर्‍यांच्या शेताच्या बांधावर पोचले आहेत.नागपूर हे संत्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेच पीक संकटात आले आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतावर जात पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Previous articleपाच दिवसांत “द रिट्रीट” हॉटेलमध्ये काय घडले!
Next articleमाहिती व जनसंपर्क  अधिका-यांचा इस्रायल दौरा रद्द करण्याची मागणी