जे स्वतःचे घर सांभाळू शकत नाहीत ते आज देश जिंकण्याच्या गोष्टी करत आहेत

मुंबई नगरी टीम

मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाविरोधात एकत्र येण्याकरता देशभरातील सर्व विरोधी पक्षांची बिहारच्या पाटणा येथे बैठक पार पडली.पाटण्यात झालेल्या या बैठकीवरून राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांनी राज्यातील विरोधी पक्षावर टीकास्त्र सोडले आहे.महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षांची अवस्था अत्यंत बिकट असून,जे लोक स्वतःचे घर सांभाळू शकत नाहीत ते आज देश जिंकायच्या गोष्टी करत आहेत, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते उदय सामंत यांनी लगावला आहे.नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून या तिन्ही पक्षांना मान्य आहेत का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपाविरोधात एकत्र येण्याकरता देशभरातील सर्व विरोधी पक्षांची पाटणा येथे बैठक आयोजित केली होती.या बैठकीला राज्यातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित उपस्थित होते.विरोधी पक्षांच्या या बैठकीवर राज्याचे उद्योगमंत्री आणि शिवसेनेचे प्रवक्ते उदय सांमत यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाची तारांबळ उडाली आहे. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचे स्थान राष्ट्रवादी पक्षाने हिसकावून घेतले आहे. विधानसभेचे विरोधी नेते अजित पवार यांना त्यांचे पद सोडावंसं वाटत आहे. काँग्रेस पक्षाने आपल्याच प्रदेशाध्यक्षाच्या विरोधात बंड पुकारले आहे.नाना पटोले यांची कधीही हकालपट्टी होऊ शकते अशी परिस्थिती विरोधी पक्षाची आहे.महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची अवस्था अत्यंत बिकट असून जे लोक स्वतःचे घर सांभाळू शकत नाहीत ते आज देश जिंकायच्या गोष्टी करतात असा टोला लगावत,नितीश कुमार हे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून तुम्हाला मान्य आहेत का ? असा सवाल त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला.

राहुल गांधी यांच्यासह ममता बॅनर्जी, नितीश कुमार आणि शरद पवार यांच्यासारखे नेते पंतप्रधान पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत. विरोधी पक्ष राष्ट्रीय पातळीवर जनतेला एकत्र असल्याचे भासवत असले तरी आतमधून ते एकमेकांचे विरोधी आहेत.त्यांचा डोळा पंतप्रधानांच्या खुर्चीवर आहे.काही करून नेरेंद्र मोदी यांना हरवायचे हेच त्यांचे एकमेव लक्ष्य आहे.विरोधी पक्षांमध्ये पारिवारीक पक्षच जास्त आहेत.या पक्षांना देश लोकशाही हा पेक्षा आपला परिवार वाचवायचा आहे.हि लोक देशाला आपला परिवार कधीच मानत नाहीत.यांचे सगळे लक्ष आपल्या परिवारावरच आहे.उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे,कॅाग्रेसला राहुल गांधी आणि राष्ट्रवादीला सुप्रिया सुळे यांचे राजकीय भविष्य सुरक्षित करायचे आहे असेही सांमत म्हणाले.बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला हिंदुत्व शिकवलो आणि राष्ट्रवाद दिला आज त्यांचेच पुत्र आज त्याच लालू प्रसाद यादव यांना समर्थन द्यायला पाटण्याला गेले.ज्या लालू प्रसाद यादव यांनी बाळासाहेबांच्या विरुद्ध अपशब्द काढले होते.हिंदुत्वाचा विरोध केला होता.पटण्यातील बैठकीत हिंदुत्वाचा पराभव कसा करायचा यावर विचारमंथन करण्यात आले.या बैठकीत हिंदुत्व विरोधी पक्ष होते आणि त्यांच्याच पंगतीला बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करून त्यांचे पुत्र आणि नातू पाटण्याला गेले ही या स्वातंत्र्य भारतामधील वैचारिक गद्दारी आहे अशी टीकाही सामंत यांनी केली.

उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत हिंदुत्वाबद्दलचे कोणते विचार मांडले.त्यांना पंतप्रधान म्हणून राहुल गांधी,शरद पवार,ममता बॅनर्जी की नितीश कुमार हवेत ? हे आधी त्यांनी स्पष्ट करावे. उद्धव ठाकरे यांनी लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्याशी युती करून हिंदुत्वावर वार केला आहे अशी टीका करतानाच आज बाळासाहेब ठाकरे जिवंत असते त्यांनी उद्धव ठाकरे यांना हे पाप करण्याची परवानगी दिली नसती असेही सांमत यावेळी म्हणाले.आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही असे महाराष्ट्रामध्ये सांगायचे आणि पाटण्याला जाऊन हिंदुत्व संपवण्याचा कटात सहभागी व्हायचे हा उद्धव ठाकरे यांचा दुटप्पीपण जनतेला आणि सैनिकांना कळायलाच हवा.महाराष्ट्रामध्ये आज सेना आणि भाजपचे सरकार आहे.आमची विचारधारा एकच आहे.आमचे लक्ष्य एकच आहे.पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश खूप चांगली प्रगती करत आहे.विकासाचं नवीन पर्व भारतात सुरु झालेले आहे. धर्मनिपेक्षतेच्या नावाखाली हिंदूंवर होणारे अत्याचार बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहेत.आणि परिवारवादी पक्षांचा पराभव होत आहे.महाराष्ट्राला राहुल गांधी,नितीश कुमार,ममता बॅनर्जी यांच्यासारखे नेते पंतप्रधान म्हणून मान्य नाहीत.पाटण्याला गेलेल्या हिंदुत्वाच्या गद्दारांनी जो पाटण्यात हिंदुत्व संपवणायचा कट रचला आहे त्याचा आम्ही निषेध करतो असेही सामंत म्हणाले.

महाराष्ट्र सांभाळता आला नाही, दिल्ली काय सांभाळणार ?
विरोधकांनी एकीची कितीही मूठ बांधली तरी त्यांना यश येणार नाही. एकवटेले विरोधक घराणेशाही टिकविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.ज्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नाही ते दिल्ली काय सांभाळणार असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला.पैशापासून सत्ता व सत्तेपासून पैसा मिळविणाऱ्या विरोधकांची पुढची पिढी धोक्यात आली आहे. म्हणून त्यांना वाटतं की आम्ही आज एकत्र आलो नाही, तर आमचे सर्वकाही उद्ध्वस्त होईल. आम्ही केलेले काळे धंदे हे उघडकीस आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पुढच्या पिढ्यांची चिंता करण्याकरिता एकत्र आले आहेत. अशा बोलघेवड्या लोकांमुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. आता महाराष्ट्राची जनता त्यांना साथ देणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

Previous articleलोकल मधिल ” त्या ” घटनेवरून अजित पवारांनी गृहखात्यावर साधला निशाणा
Next articleदेवेंद्र फडणवीस त्यावेळी प्राथमिक शाळेत असतील,त्यामुळे तेव्हाची त्यांना माहिती नसेल !