मुंबई नगरी टीम
मुंबई : राज्य सरकारने आज चार सनदी अधिका-याच्या बदल्या केल्या असून,अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांची बदली केली आहे त्याच्या जागी मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव ए. बी. उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने आज चार वरिष्ट सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त लक्ष्मी नारायण मिश्रा यांची नियुक्ती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून केली आहे.पवनीत कौर, यांची बदली आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्तपदी केली आहे. वस्त्रोद्योग विभागाच्या संचालक डॉ. माधवी खोडे चवरे यांची नियुक्ती जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
© Mumbai Nagri Designed by
Tushar Bhambare +91 9579794143