परम बीर सिंह मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

मुंबई नगरी टीम 

मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे हे आज सेवानिवृत्त झाल्याने मुंबई पोलीस आयुक्तपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परम बीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवा निवृत्त झाले आहेत.त्यामुळे शासनाने या पदावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परम बीर सिंह यांची नियुक्ती केली आहे. परम बीर सिंह १९८८ च्या भापोसे तुकडीतील आहेत.परम बीर सिंह यांच्या बदलीने रिक्त होणाऱ्या महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,या पदाचा अतिरिक्त कार्यभार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक बिपिन के.सिंग यांच्याकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात आला आहे.मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे आज सेवा निवृत्त झाले असून,आज नायगाव मैदानात मुंबई पोलीस पथकाकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. बर्वे यांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे कालच राज्य सरकारने स्पष्ट केले होते. मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी परमबीर सिंह यांच्या नावासह अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि पुण्याचे पोलिस आयुक्त के व्यंकदेशम यांच्या नावाची चर्चा होती.

Previous articleसत्तेसाठी शिवसेनेने कुठे-कुठे सेटिंग केली !
Next articleआम्ही महाराजांचे वंशज; औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर  झालेच पाहिजे