विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विरोधात महाचमत्कार होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासंदर्भात आज मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा आमच्यासाठी नक्कीच दिलासादायक आहे,तर महाविकास आघाडीसाठी बुडत्याचा पाय खोलात गेला आहे.महाविकास आघाडीचे काऊंटडाऊन सुरु झाले असून त्यांच्यासाठी न्यायालयाचा निकाल धक्कादायक आहे.राज्यसभा निवडणूकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार केला.आता विधान परिषदेच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या विरोधात महाचमत्कार होणार व त्याची वीट देशमुख – मलिकांच्या आजच्या न्यायालयाच्या निकालाने रचली गेली आहे अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली.

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना लोकशाहीने डांबून ठेवलेले नाही तर त्यांच्या कृत्याने त्यांना तुरूंगात जावे लागले आहे. त्यामुळे कोर्टावरसुध्दा आगपाखडं करण यावरुन संजय राऊत यांचे वैफल्य पुन्हा दिसून येते.अशी टिका दरेकर यांनी केली. ‘कौशल्य काय असते’ हे मविआ दाखवून देणार असे म्हणत आहेत, परंतु कौशल्य विकास मंत्रीच जेलमध्ये आहेत, त्यांनाच स्वत:च्या मतांचं कौशल्य दाखविण्याची परवानगी नाही, त्यामुळे त्यांचे कौशल्य जेरबंद झालेले आहे याची कल्पना त्यांना नाही असा टोलाही दरेकर यांनी लगावला.

Previous articleभाजपच्या प्रदेश कार्यालयावर तृतीयपंथींयांचा धडक मोर्चा …काय कारण आहे ?
Next articleकाँग्रेसला धक्का : भाजपचे प्रसाद लाड विजयी,काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव