तोंडाला मास्क लावून मंत्री के.सी. पाडवी विधानभवनात

मुंबई नगरी टीम
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेले राज्य विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या शनिवारी आटोपटे घेण्यात येणार आहे तर दुसरीकडे खबरदारीचा उपाय म्हणून खुद्द मंत्रीच दक्षता घेताना बघायला मिळत आहेत.राज्याचे आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी यांनी तोंडाला मास्क लावून विधानभवनात प्रवेश केला.

राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता सध्या सुरू असेलेल्या राज्य विधानमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी अभ्यागतांना एकदिवसीय पास देणे बंद केले आहे. तर खबरदारी म्हणून काही जण तोंडाला रूमाल लावून फिरताना विधानभवन परिसरात पाहवायस मिळाले तर राज्याचे आदिवासी विकासमंत्री के.सी.पाडवी यांनी तोंडाला मास्क लावून विधानभवनात प्रवेश केला. काल भाजपचे आमदार योगेश सागर यांनीही तोंडाला मास्क लावून विधानभवनात प्रवेश केला होता. तर आज विधानभवन परिसरात एक व्यक्ती हातात ग्लोज आणि तोंडाला मास्क लावून फिरत असल्याचे पाहवायस मिळाले.

Previous articleविधानसभा उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे आ.नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी
Next articleकेंद्रात सुटाबुटातले लुटारु सरकार!: बाळासाहेब थोरात