वाचा : जीएसटीने करदात्यांना उपलब्ध करून दिली महत्वपूर्ण सुविधा

मुंबई नगरी टीम

मुंबई: वस्तू व सेवाकर कायद्याचे अनुपालन सुलभ करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून द गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स नेटवर्कने वस्तू व सेवा करदात्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाइल नंबर वरून एसएमएस सुविधेचा उपयोग करून ‘निरंक’ जीएसटीआर -3 बी विवरणपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. महिन्यात जावक पुरवठा (विक्री) नसल्यास आणि दायित्व (रिव्हर्स चार्ज देयतेसह) नसल्यास जीएसटीआर -3 बी प्रपत्र निरंक विवरणपत्र म्हणून दाखल करता येईल. करदात्यांना ऑनलाईन पद्धतीने  निरंक विवरणपत्र दाखल करण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध असेल. या सुविधेमुळे जवळपास २०% जीएसटी  विवरणपत्र दाखल करण्याऱ्या करदात्यांचा फायदा होणार आहे. सद्या साधारणतः २० लाख करदाते  निरंक जीएसटीआर-३ बी दाखल करतात.

एसएमएसद्वारे निरंक जीएसटीआर -3 बी कसे दाखल करावे

करदात्यास पुढील स्वरूपात SMS टाइप करून  ‘NIL<space>3B<space>GSTIN<space> Tax period in MMYYYY नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 14409 या क्रमांकावर पाठवावा लागेल. उदाहरणार्थ,मे 2020 महिन्यासाठी विवरणपत्र भरण्यासाठी GSTIN 09AGBPS5577MSZC हा नोंदणी क्रमांक असलेल्या करदात्याने “NIL 3B 09AGBPS5577MSZC 052020” असा संदेश 14409 या क्रमांकावर पाठवावा. एसएमएस पाठविल्यानंतर करदात्यास एसएमएसद्वारे सहा-अंकी सत्यापन कोड प्राप्त होईल. करदात्याने हा कोड 14409 या क्रमांकावर वर SMS द्वारे “CNF<space>3B<space>06 digit verification code” पाठवून सत्यापन करावे. उदाहरणार्थ प्राप्त केलेला सत्यापन कोड 782503 असल्यास तो “CNF 3B 782503”  लिहून 14409 या क्रमांकावर पाठवेल.करदात्यास अखेरीस एप्लीकेशन रेफरन्स नंबर (एआरएन) सह एक यशस्वी संदेश प्राप्त होतो जो सूचित करतो की जीएसटीआर -3 बी यशस्वीपणे दाखल झाले आहे. वस्तू  व सेवाकरदाता जीएसटीआयएन खात्यात लॉग इन करून   Services > Returns > Track Return Status या द्वारे जीएसटी पोर्टलवर दाखल केलेल्या  विवरणपत्राची स्थिती देखील जाणून घेऊ शकतो.जीएसटी नेटवर्क (जीएसटीएन) चे मुख्य कार्यकारी अधिकारी  प्रकाश कुमार म्हणाले की, “एकंदर एक  कोटी करदात्यांना त्यांचे मासिक विवरणपत्र  जीएसटीआर ३बी दाखल करावे लागतात आणि त्यात २० लाख करदाते निरंक विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या श्रेणीत मोडतील. अशा व्यावसायिकांसाठी  जीएसटीचे अनुपालन सुलभ करण्याचे  या सुविधेचे उद्दीष्ट आहे. त्यापैकी बरेच करदाते शासकीय आणि इतर प्रतिष्ठानांच्या कंत्राटांसाठी पात्र होण्यासाठी नोंदणीकृत आहेत परंतु नियमितपणे कोणताही व्यवसाय करत नाहीत.”

एसएमएसद्वारे निरंक जीएसटीआर -3 बी दाखल करण्याची अटी

 १. करदाता, सामान्य करदाता / प्रासंगिक करदाता / एसईझेड युनिट / एसईझेड विकासक म्हणून नोंदणीकृत आहे आणि त्याचा  वैध जीएसटीआयएन आहे.

२. अधिकृत स्वाक्षरीकर्ता आणि मोबाइल नंबर जीएसटी पोर्टलवर नोंदणीकृत आहेत.

 ३. मागील कालावधीसाठी कर, व्याज किंवा विलंब शुल्काची कोणतेही प्रलंबित देयता नाही.

४. मागील सर्व जीएसटीआर 3 बी विवरणपत्र योग्यरित्या दाखल केलेले आहेत

५. फॉर्म जीएसटीआर -3 बी च्या ऑनलाइन आवृत्तीमध्ये कोणताही विवरणपत्र जतन केलेल्या टप्प्यात नाही.

निरंक जीएसटीआर -3 बी, महिन्याच्या 1 तारखेला किंवा त्यानंतर दाखल केले जाऊ शकते. उदाहरणार्थ, मे २०२० च्या महिन्यासाठी, १ जून २०२० रोजी किंवा त्यानंतरच निरंक विवरणपत्र दाखल करता येईल. विशिष्ट जीएसटीआयएनसाठी सर्व अधिकृत प्रतिनिधीं एसएमएसद्वारे निरंक जीएसटीआर-3 बी विवरणपत्र दाखल करू शकतात. निरंक जीएसटीआर -3 बी विवरणपत्र दाखल करण्यासाठी पात्रता व प्रक्रियेविषयी अधिक माहिती जीएसटी पोर्टलच्या मदत विभागात आढळू शकते.

जीएसटीएन बद्दलः

वस्तू व सेवा कर नेटवर्क (जीएसटीएन) ही कलम ८ (नवीन कंपनी कायद्यांतर्गत, नफा कंपन्यांसाठी नाही तर कलम 8 अंतर्गत शासित असतात), बिगर सरकारी, खासगी मर्यादित कंपनी मार्च २०१३ मध्ये स्थापन करण्यात आली.कंपनीची स्थापना प्रामुख्याने वस्तू व सेवा कर (जीएसटी) च्या अंमलबजावणी साठी केंद्र व राज्य सरकारे, करदात्या आणि इतर भागधारकांना माहिती तंत्रज्ञान आणि मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी करण्यात आली आहे.

Previous articleफडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून “या बाबींकडे” लक्ष देण्याची केली विनंती !
Next articleजितेंद्र आव्हाडांचा “तो” मास्क चर्चेत !