नैतिक जबाबदारी स्वीकारून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा

मुंबई नगरी टीम

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी पक्षामध्येच दोन भूमिका घेतल्या जात आहे, परंतु धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी समजून आपला राजीनामा देणे उचित ठरेल अशी स्पष्ट भूमिका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी घेतली .

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे वक्तव्य केले आहे.तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचा निर्णय झाला नाही.यामधून ते त्यांची बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे पण हे योग्य नाही. असे सांगतानाच दरेकर म्हणाले की,अशा प्रकारचे गंभीर आरोप होत असताना प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनतेच्या मनात एक वेगळं चित्र उभं राहत आहे. त्यामुळे या परिस्थितीत या अग्निपरीक्षेला सामोरं जाण्याची आवश्यकता आहे. तसेच त्यांचा राजीनामा मागण्यापेक्षा धनंजय मुंडे यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा जर या प्रकरणात त्यांचे निर्दोषत्व सिद्ध झाले तर त्यांना पुन्हा मंत्री मंडळात प्रवेश मिळू शकतो.या पूर्वीही शिवसेना भाजप युतीच्या काळात अशा प्रकारची स्थिती निर्माण झाल्यांनतर शिवसेनाप्रमुखांनी तत्कालीन मंत्री शशिकांत सुतार, बबनराव घोलप यांचा राजीनामा घेतले होते. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या मंत्र्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते, अशी आठवणही दरेकर यांनी करून दिली. आता राज्यामध्ये शिवसेनाप्रमुखांचे सुपुत्र उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनीही तश्या स्वरूपाचा निर्णय घ्यावा अशी मागणीही दरेकर यांनी केली.

Previous articleतक्रारदार महिला पुन्हा पोलीस ठाण्यात,धनंजय मुंडेंचाही जबाब नोंदवणार ?
Next articleधनंजय मुंडे प्रकरणावर संजय राऊत काय म्हणाले ?