शरद पवार होम क्वारंटाईन; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोन करून केली विचारपूस

मुंबई नगरी टीम

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे.याची माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.सध्या पवार हे होम क्वारंटाईन आहेत त्यांची प्रकृती बरी आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा कोरोना अहवाल सकारात्मक आला आहे. पवार यांनी याची माहिती स्वत: दिली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने पवार यांच्यावर उपचार सुरू असून, गेल्या दोन- तीन दिवसात संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोना चाचणीकरावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे. पवार यांना कोरोनाची लागण झाल्याने पुढील ७ दिवसाचे त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. पवार यांचा कोरोना अहवाल नकारात्मक आल्यानंतर पुन्हा नियोजित कार्यक्रम होतील असेही मलिक यांनी सांगितले.दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता.

Previous articleमहाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार ! मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव सादर
Next articleनिवडणुकीतील अपयशामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा थयथयाट