विधानपरिषदेच्या निवडणूकीपूर्वी सुनावणी असल्याचे लक्षात ठेवा !

विधानपरिषदेच्या निवडणूकीपूर्वी सुनावणी असल्याचे लक्षात ठेवा !

केसरकरांचा राणेना अप्रत्यक्ष इशारा

मुंबई दि. १६ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एक जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. हि निवडणूक लढविण्याबाबत नारायण राणे संभ्रमात असले तरी या निवडणूकीपूर्वी सक्त वसुली संचालनालयाकडून व्यवस्थित तपास होत नसल्याबद्दल उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे त्याची सुनावणी येत्या २९ नोव्हेंबरला असल्याची वस्तुस्थितीची माहिती सिंधुदूर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

आज मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना केसरकरांना राणे यांच्या संदर्भात छेडले असता त्यांनी वरील वस्तुस्थिती सांगितली. राणे यांच्या बेहिशोबी मालमत्तेसंदर्भात सक्तवसुली संचालनालय व्यवस्थित तपास करीत नसल्यामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या केसची सुनावणी येत्या २९ नोव्हेंबर होणार आहे. त्यामुळे या निवडणूकीपुर्वी हि सुनावणी आहे हे लक्षात घ्या, असा अप्रत्यक्ष इशाराच केसरकर यांनी यावेळी दिला. कॅांग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर काढलेल्या व्यंगचित्राबाबत केसरकर यांना विचारणा करण्यात आल्यानंतर असेच व्यंगचित्र काढल्यामुळे तामिळनाडू राज्यात एका व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची आठवण करून देत नितेश राणे यांच्या सारख्या छोट्या मुलाच्या प्रश्नांना उत्तर देणे योग्य नसल्याचेही केसरकर म्हणाले. मी गृहराज्यमंत्री झाल्यापासुन कोकणातील दहशत कमी झाल्याचा दावा केसरकर यांनी करून, एकाने यापूर्वी एक मासाच मारला असे सांगत अप्रत्यक्ष नितेश राणेंवर प्रहार केला. यापूर्वी बेहिशोबी संपत्ती जमा केल्याच्या प्रकरणात एकाच कुटूबांतील दोन बड्या राजकिय नेत्यांना तुरूंगाची हवा खावी लागली आहे. आता तीन जणांना तुरूंगाची खावी लागेल असे चित्र असल्याचे केसरकर म्हणाले.

Previous articleकृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ
Next articleपाशा पटेल यांना राज्यमंत्र्याचा दर्जा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here