कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ

कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ

३० नोव्हेंबरपर्यंत वीज खंडित होणार नाही.

मुंबई दि.१६ राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यास आज शासनाने १५ दिवासांची मुदतवाढ दिली. आता ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांची वीज खंडित होणार नाही.

३० ऑक्टोबरलाच थकित वीजबिलाच्या वसुलीसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ ची घोषणा केली होती. या घोषणेनुसार शेतकऱ्यांना ७ नोव्हेंबरपर्यंत थकबाकीचा पहिला हप्ता भरायचा होता. ही मुदत आता ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. चालू वीजबिल ३० नोव्हेंबरपर्यंत शेतकऱ्यांना आता भरता येईल.३० नोव्हेंबरपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांने वीज कनेक्शन खंडीत केले जाणार नाही. ३० हजार रूपयापर्यंत मूळ रक्कमेचे पाच हप्ते करण्यात आले असून मुद्दल  मूळ रक्कमेचे पाच हप्ते डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत शेतकऱ्यांनी भरायचे आहे.

ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत वीजबिल वितरीत करण्यात आले नाही, त्या शेतकऱ्यांना महावितरणने त्वरीत वीजबिलाची वाटप करण्याच्या सूचनाही आज दिल्या.  मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना चा लाभ शेतकऱ्यांनी घेतला तर शेतकऱ्यांचे दंड व्याज बाजूला ठेवण्यात येईल. अनधिकृत वीजजोडण्या विरुध्द नियमानुसार कारवाई करावी. सदर योजनेतील इतर अटी व शर्तीं मध्ये अन्य कोणताही बदल नाही

Previous articleमंत्रालयात प्लास्टिक बाटल्यांवर बंदी !
Next articleविधानपरिषदेच्या निवडणूकीपूर्वी सुनावणी असल्याचे लक्षात ठेवा !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here