मुख्यमंत्र्यांचा कारभार पारदर्शक असल्यामुळे काही दिसत नाही

मुख्यमंत्र्यांचा कारभार पारदर्शक असल्यामुळे काही दिसत नाही

सुप्रिया सुळे यांची टीका

यवतमाळ : खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारने कर्जमाफी केलेल्या फसव्या आणि खोटया जाहिरातीवर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी बोंडअळीमुळे प्रार्दुभाव झालेल्या शेतकऱ्यांचे जी फॉर्म अदयाप सरकारने भरुन घेतलेले नाहीत. शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामेही सरकारने केले नाही त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांचा कारभार एकदम पारदर्शक आहे कारण तो पारदर्शक असल्यामुळेच दिसत नाही अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चाच्या सभेत बोलताना सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री सहा हजार कोटीची कर्जमाफीची रक्कम बॅंकांकडे दिल्याचे बोलत आहे. परंतु बॅंकवाले कर्जमाफीचे पैसेच बॅंकेमध्ये जमा झाले नसल्याचे सांगत आहेत. मग हे पैसे गेले कुठे. ते पारदर्शक झाले का ? अशी बोचरी टिकाही केली. मी लाभार्थी या जाहिरातीवर त्यांनी आक्षेप नोंदवला. त्यांनी लाभार्थी बोलून सरकारने शेतकऱ्यांचा अपमान केला असल्याचे सांगताना डिजिटल झालेल्या हरिसाळ गावातील डिजिटल किस्सा सर्वांना सांगितला आणि सरकार कशापध्दतीने खोटया जाहिराती करत आहे स्पष्ट केले. जोपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जात नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वस्थ बसणार नाही असे यावेळी सुळे यांनी स्पष्ट केले.

Previous articleसरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच मनसेचा दहशत माजवण्याचा प्रयत्न
Next articleगांधींच्या मार्गाचा अवलंब करणा-या काँग्रेसने हिंसा करणे कितपत योग्य ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here