राज्यातील ४४४ धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट
नागपूर : महाड येथिल सावित्री पुलावरील दुर्घटनेला दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरी धोकादायक असलेल्या पुलांची दुरूस्ती अद्यापही झालेली नाही. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या एकूण १३ हजार १५१ पुलांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी धोकादायक बनलेल्या ४४४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करून घेण्यात आले आहे. या पुलांच्या दुरूस्तीसाठी ७९२ कोटीचा खर्च लागणार असल्याने उपलब्ध निधीनुसार प्राधान्याने दुरूस्तीची कामे हाती घेतली जाणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली.