भाजप आमदाराच्या रूममध्ये साप !

भाजप आमदाराच्या रूममध्ये साप !

नागपूर : सध्या नागपूर मध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून, आज रात्री भाजपचे आमदार यांच्या रूम मध्ये साप आढळल्याने एकच धावपळ झाली. अत्यंत संवेदनशील समजल्या जाणा-या आमदार निवासस्थानात आमदाराच्या रूममध्ये साप आढळल्याने आमदार निवासस्थानाच्या सुरक्षेची पोलखोल झाली आहे.

अधिवेशनासाठी नागपूर मध्ये आलेल्या आमदारांची निवासाची व्यवस्था येथिल आमदार निवासस्थानात केली जाते. आमदार निवासस्थानातील इमारत क्रमांक दोन मधिल तळमजल्यावर असलेल्या रूम नंबर ५१ मध्ये भाजपचे तुमसरचे आमदार चरण वाघमारे राहतात. या रूममध्ये आज सुमारे ८:३० च्या दरम्यान तीन फूटी साप आढळल्याने एकच धावपळ उडाली. याची खबर सुरक्षा व्यवस्थेला देण्यात आल्यानंतर एका सर्प मित्राने या सापाला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र साप पकडताना या सर्प मित्राला साप चावला असल्याचे समजते.अत्यंत संवेदनशील समजल्या जाणा-या आमदार निवासस्थानातील सोईसुविधा वरून आमदारांमध्ये प्रचंड नाराजी असतानाचा आज आमदाराच्या रूममध्ये साप आढळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Previous articleमाहिती अधिकाराचा गैरवापर होत असल्यास कारवाई करणार
Next articleमुख्यमंत्र्यांच्या माहिती तंत्रज्ञान विभागात घोटाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here