आज स्कूल बस बंद तर; शाळा सुरू राहणार !
मुंबई : भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ भारीपचे अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी आज बुधवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.या बंदच्या पार्श्वभूमीवर आज स्कूल बस मालक-चालक संघटनेने स्कूल बस न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मुंबईतील शाळा सुरूच राहणार आहेत.
भिमा- कोरेगाव घटनेचे पडसाद मुंबईसह उपनगरामध्ये उमटले आहेत. महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज स्कूल बस मालक-चालक संघटनेने स्कूल बस न चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु शाळा मात्र सुरूच राहणार आहेत. शाळांना सुट्टी देण्यात आली नसल्याची माहिती मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली आहे.आज मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, वसई-विरार जिल्ह्यातील शाळा सुरू असतील, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे . बंदच्या पार्श्वभूमीवर शाळेतील मुलांची सुरक्षितता आणि बसचे रक्षण करण्यासाठी सकाळच्या सत्रात स्कूल बस धावणार नाही, असा निर्णय स्कूल बस मालक-चालक संघटनेने घेतला आहे.आज बुधवारी सकाळची परिस्थिती पाहून दुपारच्या सत्रातील स्कूल बस चालवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचे सांगितले आहे.