मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचे निम्मे शैक्षणिक शुल्क राज्य सरकार भरणार

मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांचे निम्मे शैक्षणिक शुल्क राज्य सरकार भरणार

मुंबई : मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना तब्बल ६०५ शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी लागणारी निम्मे शुल्क राज्य सरकार भरणार असून, यासंदर्भातील शासन निर्णयातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना आज झालेल्या मराठा समाजाच्या मागण्यांवर नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.

मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री विजय देशमुख, कामगार मंत्री संभाजी निलंगेकर पाटील आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.मराठा समाजातील समस्यांचा अभ्यास करून योग्य उपाय योजना सुचविण्यासाठी स्थापण्यात आलेल्या  ‘सारथी’संस्थेची रचना व कार्यपद्धती ठरविण्यासाठी नेमलेल्या डॉ. सदानंद मोरे यांच्या समितीला ‘सारथी’ संस्थेचे कामकाज सुरू होईपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत घोषित केलेल्या नव्या योजनांची कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावे तसेच आर्थिक मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठीची उत्पन्न मर्यादा आठ लाखापर्यंत करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

Previous articleमहाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर ‘माझी कन्या भाग्यश्री’ अभियान पुढे ढकलले
Next articleआज स्कूल बस बंद तर; शाळा सुरू राहणार !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here