अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पतंजली योगपीठाला भेट

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची पतंजली योगपीठाला भेट

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज हरिद्वार येथील पतंजली योगपीठ येथे भेट देत पतंजली योग‍पीठ चे आचार्य बाळकृष्‍णजी यांच्‍याशी चर्चा केली.

या भेटीदरम्‍यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आचार्य बाळकृष्‍ण यांच्‍याशी शेतक-यांच्‍या विविध प्रश्‍नांवर विस्‍तृत चर्चा केली. जनावरांचे खाद्य, फुड पार्क, वनोपज व वनऔषधीचा वापर आदींच्‍या माध्‍यमातुन रोजगार निर्मीती याबाबत चर्चा झाली. पतंजली योगपीठाच्‍या माध्‍यमातुन देशहित साधले जात असुन, त्‍या माध्‍यमातुन लाखों हातांना रोजगार दिला जात आहे. विशेषतः शेतक-यांसाठी जे कार्य पतंजली योगपीठ करीत आहे ते निश्‍चीतच प्रशंसनीय व अनुकरणीय असल्‍याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. महाराष्‍ट्रात शेतक-यांच्‍या प्रश्‍नांवर काम करताना त्‍यांच्‍या अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ मिळावा अशी अपेक्षा त्‍यांनी  यावेळी व्‍यक्‍त केली.

Previous articleमंत्रालयासमोर तरूणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न !
Next articleरायगडच्या पालकमंत्रीपदावरुन प्रकाश मेहतांना हटवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here