अधिकृत चाळीत राहणाऱ्या रहिवाश्यांना’झोपु’तून घरे देण्याचा प्रस्ताव !

अधिकृत चाळीत राहणाऱ्या रहिवाश्यांना’झोपु’तून घरे देण्याचा प्रस्ताव 

मुंबई :  झोपडपट्टीमधील अधिकृत चाळींच्या पहिल्या  मजल्यावर राहणाऱ्या राहिवाश्यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून घरे देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.

आज मंत्रालयात चाळींच्या पहिल्या मजल्यावरील राहिवाशांच्या मागण्या संदर्भात बैठक झाली. त्यावेळी महेता यांनी निर्देश देऊन एकूणच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा आढावा घेतला.गृहनिर्माणमंत्र्यांनी यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण्याच्या ऑनलाइन यंत्रणेचे काम पूर्ण करावे. सर्व माहिती अपडेट करून सुरू असलेली कामे तातडीने मार्गी लावावी,असेही निर्देश देतानाच बायोमेट्रिक सर्वेक्षण,प्रधानमंत्री आवास योजना,मोडकळीस आलेल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास या बाबतचाही आढावा घेतला.

या बैठकीला खासदार गोपाळ शेट्टी, आमदार योगेश सागर, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजीव कुमार, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कपूर,मुंबई क्षेत्र विकास व गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे, आदि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Previous articleनारायणगड, गहिनीनाथ गडासाठी पंकजाताई मुंडेंनी तातडीने दिले २ कोटी
Next articleउध्दव ठाकरे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here