मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट

मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट

मुंबई : काल दादर माटुंगा दरम्यान आपल्या मागणीसाठी रेल्वे अप्रेंटिस केलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. या विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने आज रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेवून रेल्वे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची कैफियत मांडली.

नव्याने होणाऱ्या नोकर भरतीमध्ये रेल्वे बोर्ड प्रणालीने ठरविलेल्या २० टक्के राखीव कोट्याअंतर्गत रेल्वेमध्ये अप्रेंटिस केलेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनाच सामावून घेतले जाईल असे आश्वासन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी मनसेच्या शिष्टमंडळास दिले.मनसे नेते बाळा नांदगांवकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, सरचिटणीस मनोज चव्हाण, संदिप देशपांडे, मनसे रेल्वे सेनेचे सरचिटणीस जितु पाटील यांचा या शिष्टमंडळात समावेश होता.

रेल्वेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी संपूर्ण भारतातून हजारोच्या संख्येने आलेल्या प्रशिक्षणार्थीनी काल दादर ते माटुंगा दरम्यान आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला होता.त्याच दरम्यान या विद्यार्थ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेवून आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या होत्या.रेल्वे अप्रेंटिस विद्यार्थ्यांच्या नोकरी नियुक्तीबाबत सप्टेंबर २०१७ च्या निर्णयाला अधीन राहून या प्रशिक्षणार्थीच्या निवडीबाबत सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक निर्णय घेण्याचे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिले.

Previous articleकॅनडाच्या नागरिकत्वामुळे अक्षय कुमारची राज्यसभेची संधी हुकणार ?
Next articleअखेर आंगणवाडी सेविकांना मेस्मातून वगळले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here