भुजबळ सोमवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तुरुंगातून बाहेर येताच भायखळा मंडई येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु असून,त्यांना सोमवारी डिस्चार्ज मिळणार आहे.
सोमवारी छगन भुजबळांना बाहेर येताच त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी मुंबई काॅग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.सोमवारी दुपारी १ वाजता भायखळा मंडई येथे भुजबळांचे जल्लोशपूर्ण स्वागत करण्यात येणार असून,यावेळी भुजबळ हे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.अशी माहिती मुंबई राष्ट्रवादी काॅग्रेसचे अध्यक्ष सचिन अहीर यांनी दिली.