शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट

मुंबई :  राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन नेत्या मध्ये सुमारे तासभर  बंद दाराआड चर्चा झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

येत्या २५ जून रोजी मुंबई पदवीधर, शिक्षक विभागाच्या विधानपरिषदेच्या  निवडणूका होत असून, या पार्श्वभूमीवर विविध पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेठी सुरू आहेत. आज राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. तावडे आणि ठाकरे यांच्यात सुमारे तासभर  बंद दाराआड चर्चा झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.ठाण्यामध्ये होणा-या  नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी तावडे हे राज ठाकरे यांच्या घरी गेल्याची चर्चा सुरू आहे.

Previous article… आणि माजी मंत्री भास्कर जाधवांना लागला शॉक  
Next articleशेतकरी म्हणून शेतकऱ्यांच्या संघर्षाला साथ : शरद पवार