रजनीकांतची पत्नी लता यांनी घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई : सुप्रसिद्ध तामिळ अभिनेते शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत यांच्या पत्नी लता रजनीकांत यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राजकारण, समाजकारण, सिनेमा अशा अनेक विषयांवर उभयतांत चर्चा झाली.