विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांना डेंग्यू
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटलांना डेंग्यू झाल्याचे निदान झाले आहे. याची माहिती खुद्द विखे पाटील यांनी आज ट्विटरद्वारे दिली असून,डॅाक्टरांना विश्रांतीचा सल्ला दिल्याने काही दिवस पूर्व नियोजित कार्यक्रमांना उपस्थितराहू शकणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
नागपूर येते झालेल्या पावसाळी अधिवेशन काळात मला डेंग्यू झाल्याचे निदान झाले असून, डॅाक्टरांनी उपचारादरम्यान सक्तीचा विश्रांती घेण्याचा तसेच सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पुढील राही दिवस मी पूर्वनियोजित कार्यक्रमांना उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती विखे यांनी ट्विट करून दिली आहे.










