हर्षवर्धन जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा
औरंगाबाद : शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे ई मेलद्वारे राजीनामा पाठवला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास राजीनामा देण्याचा इशारा कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला होता. राज्यात मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आज आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे ई मेलद्वारे राजीनामा पाठवला आहे.
शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव हे गेल्या दोन दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनास बसले होते. मराठा समाजाच्या आरक्षणाचा अध्यादेश न काढल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिला होता.विधानसभा अध्यक्षांनी मी दिलेला राजीनामा २४ तासामध्ये मंजूर करावा, किंवा आरक्षण अध्यादेश काढावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.










