नारायण राणे  मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल

नारायण राणे  मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावर दाखल

मुंबई : मराठा समाजाचे राज्यभरात सुरू असलेले आणि आज मुंबईसह उपनगरात केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहोचले आहेत. या भेटीत राणे मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.

राज्यात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि भाजपच्या कोट्यातून राज्यभसभेवर गेलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत. आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्याकडे मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भातला अहवाल तयार करण्याची जबाबदारी होती. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही मागणी नारायण राणे यांनी सुरुवातीपासून लावून धरली आहे.या बैठकीत काय चर्चा हईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Previous articleहर्षवर्धन जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा
Next articleशिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा