शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीच्या आमदाराचा राजीनामा
औरंगाबाद : मराठा समाज आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिलेला असतानाच आता वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.त्यांनी आपला राजीनामा विधानसभाध्यक्षांना ई मेलद्वारे पाठवला आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिलेला असताना त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर पाटील यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणासाठी आपण राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.










