इंदापूरचे आमदार दतात्रय भरणे यांचा राजीनामा

इंदापूरचे आमदार दतात्रय भरणे यांचा राजीनामा

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे काॅग्रेसचे आमदार भारत भालके,मोहळचे आमदार रमेश कदम यांच्यानंतर राष्ट्रवादी काॅग्रेसचे इंदापूरचे आमदार दतात्रय भरणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक आमदारांचे राजीनामा सत्र सुरू असून,पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे काॅग्रेसचे आमदार भारत भालके,मोहळचे आमदार रमेश कदम यांच्यानंतर राष्ट्रवादी काॅग्रेसचे इंदापूरचे आमदार दतात्रय भरणे यांनी आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चांदवड मतदार संघातील भाजपचे आमदार डॉ राहुल आहेर आणि भाजपच्या पश्चिम नाशिक मतदार संघाच्या आमदार सीमा हिरे यांनीही आज आमदारकीचा राजीनामा दिला आहे.परंतु त्यांनी आपले राजीनामे अध्यक्षांकडे सुपूर्द न करता मराठा क्रांती समाजच्या समन्वयकांकडे दिला आहे.

Previous articleमराठा आरक्षणासाठी भाजपा सरकारचे प्रामाणिक प्रयत्न
Next articleजातीच्या आधारावर नव्हे; तर आर्थिक निकषांवर आरक्षण हवे: राज ठाकरे