जातीच्या आधारावर नव्हे; तर आर्थिक निकषांवर आरक्षण हवे: राज ठाकरे
पुणे: सरकारी नोकऱ्या कमी होत असताना आणि खासगी कंपन्यांमधील नोकऱ्या वाढत असताना या आरक्षणाचा उपयोग काय होणार असा प्रश्न उपस्थित करत जातीच्या आधारावर आरक्षण न देता ते आर्थिक निकषांवर दिले गेले पाहिजे अशी भूमिका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यात झालेल्या पक्ष मेळाव्यात मांडली.
सध्या राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीच्या आधारावर आरक्षण न देता ते आर्थिक निकषांवर दिले गेले पाहिजे अशी भूमिका मांडली.नोकरी आणि शिक्षणात संधी मिळावी म्हणून आरक्षणाची मागणी केली जात असली तरी आरक्षण मिळाल्यास ते केवळ सरकारी नोकरी मध्ये मिळेल मात्र सरकारी नोकऱ्या कमी होत असताना आणि खासगी कंपन्यांमधील नोकऱ्या वाढत असताना या आरक्षणाचा उपयोग किती आणि काय होणार असा सवाल राज ठाकरे उपस्थित केला.
मराठा समाजाने शांततेत काढलेल्या मोर्चांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मात्र राजकारण्यांच्या राजकारणाला बळी पडू नका. हकनाक स्वतःचा जीव गमावून बसू नका असे आवाहन ठाकरे यांनी या मेळाव्यात केले. आर्थिक निकषांवर आरक्षण दिले गेल्या अनेक प्रश्न सुटतील असेही ठाकरे म्हणाले. पक्ष कोणताही असो त्यांच्या राजकारणाला भुलू नका, सरकार लोकांच्या भावनांशी खेळत आहे असाही आरोप ठाकरे यांनो केला.या मेळाव्याला मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान आणि भाजपवर निशाणा साधला.
.










