राज्यात बदलाचे वारे वाहू लागले : नवाब मलिक

राज्यात बदलाचे वारे वाहू लागले : नवाब मलिक

मुंबई : सध्या राज्यातील परिस्थिती बदलत असून आगामी विधानसभा निवडणूकीत राज्यातील जनता बदल करण्याच्या विचारात आहे आणि तसेच निकाल लागतील असा दावा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना केला.

सांगली आणि जळगाव महानगरपालिकेचे निकाल उद्या लागणार असून सांगली महानगरपालिकेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला बहुमत मिळेल अशी आशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.राज्यातील एकंदरीत वातावरण पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगली आणि जळगाव या दोन्ही महानगरपालिकांच्या निवडणूकांच्या प्रचाराला उपस्थित राहू शकले नाहीत. याचाच अर्थ जनतेमध्ये रोष आहे हे त्यांना ठाऊक झाले आहे असा टोला लगावत सध्या राज्यात परिस्थिती बदलत असून आगामी विधानसभा निवडणूकीत राज्यातील जनता बदल करण्याच्या विचारात आहेत आणि तसेच निकाल लागतील असेही मलिक म्हणाले.

Previous articleआरक्षणासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करणार : मुख्यमंत्री
Next articleनाराजीच्या वातावरणातही भाजपला घवघवीत यश