मंत्रालयासमोर विवाहित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मंत्रालयासमोर विवाहित महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई : पोलिसांमध्ये तक्रार दाखल करूनही त्रास देणा-या संबंधितावर पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याच्या कारणास्तव एका विवाहित महिलेने आज दुपारी मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

दिपाली खंडू भोसले वय २७ वर्षे, समतानगर, एच.पी. काॅलनी,वाशी नाका, चेंबूर येथिल राहणा-या या विवाहित महिलेला सय्यद महंमद अन्सारी ही व्यक्ती त्रास देत असल्याच्या कारणास्तव त्याच्या विरोधात आरसीएफ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे .परंतु याबाबत पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात येत नसल्याने सदर महिला आज दुपारी यासंदर्भात दाद मागण्यासाठी मंत्रालयातील गृह विभागात आली असता तिला मंत्रालयाच्या मुख्य प्रवेद्वाराजवळच अडवले असता तीने मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच अंगावर रॉकेल ओतून घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, सदर महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. परंतु दिपाली भोसले या बेशुध्द पडल्याने त्यांना पोलिसांनी तातडीने जे.जे.हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले आहे.पुढील तपास मरीन ड्राईव्ह पोलिस करीत आहेत.

Previous articleअतिरिक्त पोलीस महासंचालक व पुणे पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करा!: 
Next articleकोकणात जाणा-या गणेशभक्तांना ” टोल फ्री”