५६ इंचाच्या पंतप्रधानांसाठी राष्ट्रवादीची ‘जवाब दो’ मोहिम

५६ इंचाच्या पंतप्रधानांसाठी राष्ट्रवादीची ‘जवाब दो’ मोहिम

 नवाब मलिक

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ इंचाची छाती असल्याचे सांगणाऱ्या पंतप्रधानांसाठी ‘जवाब दो’ही मोहिम सुरु केली असून, समाज माध्यमातून ५६ सवाल सरकारला विचारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

केंद्र आणि राज्यसरकारला जवळपास साडेचार वर्षे झाली असून आतापर्यंत दिलेली आश्वासने देण्यात आली होती. परंतु ही आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ५६ इंचाच्या पंतप्रधानांसाठी ५६ सवाल मोहिम ५ सप्टेंबरपासून सुरु करण्यात आली आहे. समाज माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन हे सवाल सरकारला केले जाणार आहेत. कालपासून हे सवाल विचारण्यास सुरुवात झाली आहे. याशिवाय फेसबुक अकाऊंटवरही हे सवाल केले जात आहेत. जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही पक्षाच्या माध्यमातून सरकारला करणार असून रोज एक सवाल विचारला जाणार आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले.६ सप्टेंबरचा राष्ट्रवादीचा सवाल- कितने लोगोंके खातेमें १५ लाख रुपये आ गये मोदीजी? जवाब दो…

 

Previous articleअखेर आ.राम कदमांनी मागितली माफी
Next articleअतिरिक्त पोलीस महासंचालक व पुणे पोलीस आयुक्तांना तातडीने निलंबित करा!: