अवनी प्रकरण मुनगंटीवारांना महाग पडणार?

अवनी प्रकरण मुनगंटीवारांना महाग पडणार?

मंत्रिपदावरुन हटवण्याची मनेका गांधींचा मुख्यमंत्र्यांना सल्ला
पुणे:अवनी या नरभक्षक वाघिणीची गोळी घालून शिकार करण्याचे प्रकरण वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना महागात पडण्याची चिन्हे आहेत. केंद्रीय महिला आणि बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना पदावरुन हटवावे अशी मागणी त्यांनी  मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली  आहे.

अवनी वाघिणीच्या हत्येवरुन सोशल मीडियावर राज्य सरकार, वन खाते आणि मुनगंटीवार यांना लक्ष्य करण्यात येत आहे. मनेका गांधी यांनी अवनीच्या मृत्यूवर दु:ख व्यक्त करतानाच राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. वनमंत्री मुनगंटीवार यांना हटवण्यात यावे, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली  आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे.

Previous articleमनेका गांधी यांनी राजीनामा दिला पाहिजे : मुनगंटीवार यांचा पलटवार
Next articleमाझ्यासाठी दिवाळीच्या सणापेक्षा शेतकर्‍यांपुढील संकट महत्वाचे- धनंजय मुंडे