आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले

आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
नाशिकमध्ये नांदगावकरांच्या वाहनाला अपघात

कोल्हापूर:युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज एका दुर्घटनेतून अगदी थोडक्यात बचावले. आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना एका कार्यक्रमात होते. अचानक मंडप कोसळला. पण आदित्य सुखरूप बचावले. मंचावरील सर्वजण सुखरूप असल्याचे समजते.

युवा सेना प्रमुख निवडणुकीच्या दृष्टीने दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. या दरम्यान त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. कोल्हापूरमधील सरूड गावात आदित्य यांचा कार्यक्रम सुरू होता. पण जोरदार वाऱ्यांनी मंडप उडून गेला. शिवसैनिकांनी आदित्य यांना लगेच सुरक्षित ठिकाणी नेले. मंचावरील कार्यकर्त्यांना खांब धरून राहण्याची वेळ आली. मात्र या घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात आले.

दुसरा अपघात नाशिकमध्ये मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या वाहनाला झाला. नांदगावकर यांच्या इनोव्हाला कळवण पोलिसांच्या जीपची धडक बसली. इनोव्हाच्या मागील बंपरची बाजूच तुटली आहे. पण नांदगावकरांना इजा झालेली नाही.

Previous articleसरकारची आणखी एक फसवी घोषणा कोर्टात उघड : मुंडे
Next articleमंत्र्यांना कांदे फेकून मारा:राज ठाकरे