शिवस्मारकाच्या खर्चात १ हजार कोटींनी वाढ

शिवस्मारकाच्या खर्चात १ हजार कोटींनी वाढ

मुंबई: अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामास अद्यापही सुरूवात झाली नसली तरी या स्मारकाच्या खर्चात  1 हजार कोटींची वाढ झाली आहे.दोन वर्षापूर्वी या स्मारकासाठी नेमण्यात आलेल्या व्यवस्थापन सल्लागार कंपनीने २ हाजार ६९२ कोटी ४० लाख रूपयाचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र आता या स्मारकाचे काम पुढे गेल्याने  3 हजार 643 कोटी ७८ लाख कोटी रूपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रसासन विभागाने जारी केला आहे.

१४ जुन १९९६ पासून विचाराधीन असलेल्या शिवस्मारकाच्या या प्रस्तावाला २२ जानेवारी १९९७ तत्वत: स्वीकृती मिळाली. २ फेब्रूवारी २००५ रोजी गोरेगाव ऐवजी हे स्मारक अरबी समुद्रात उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.२ एप्रिल २०१६ रोजी या प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार म्हणून मे.इजिस इंडिया या कंपनीची नेमणूक करण्यात आली. शिवस्मारकासाठी या सल्लागाराने एकूण २ हजार ६९२ कोटी ५० लाखाचे अंदाजपत्रक तयार केले होते. त्यानंतर १ नोव्हेंबर २०१८ च्या निर्णयानुसार ५ वर्षाच्या कालावधीत कामासाठी ३ हजार ७०० कोटी ४८ लाख रूपयांना मान्यता देण्यात आली. शिवस्मारकासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 डिसेंबर 2016 रोजी जलपूजन केले होते. तर दोनच महिन्यांपूर्वी शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भूमिपूजनाचे आयोजन केले होते. मात्र अद्यापही शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात झालेली नाही. या काळात शिवस्मारकाच्या खर्चात 1 हजार कोटींची वाढ झाल्याने या प्रकल्पाचा  खर्च आता 3 हजार 643 कोटी रुपयांवर गेला आहे. कालच सामान्य प्रशासन विभागाने मुळ स्मारकाचा खर्च व त्याचबरोबर वस्तु व सेवा कर मिळून ३ हजार ६४३ कोटी ७८ लाखाच्या अंदाजपत्रकाला मान्यता दिल्याचा शासन निर्णय जारी केला आहे.

Previous article२७ फेब्रुवारी रोजी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार
Next articleबिहारमधील निवडणूकीमध्ये छगन भुजबळांची निर्णायक भूमिका