बिहारमधील निवडणूकीमध्ये छगन भुजबळांची निर्णायक भूमिका

बिहारमधील निवडणूकीमध्ये छगन भुजबळांची निर्णायक भूमिका

मुंबई : आज नवी दिल्ली येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सदन येथे बिहारमधील आगामी निवडणुकीसंदर्भात बैठक संपन्न झाली.

या बैठकीत राष्ट्रीय लोकसमता पार्टीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह,लोकतांत्रिक जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव,काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल इत्यादी नेते हजर होते. या बैठकीमध्ये बिहारमधील आगामी निवडणुकीबाबत चर्चा होऊन राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात समविचारी पक्षांचे महागटबंधन करण्याचा निर्णय झाला. महागटबंधनबाबत निर्णय आणि निवडणुकीची दिशा ठरवल्यानंतर एआयसीसी मध्ये जाऊन महागटबंधन जाहीर करण्यात आले.यावेळी माजी खासदार समीर भुजबळ हेही उपस्थित होते.

Previous articleशिवस्मारकाच्या खर्चात १ हजार कोटींनी वाढ
Next articleसरळसेवा भरतीत पुन्हा समांतर आरक्षण लागू