भीमा कोरेगावला जाणारच, आम्हाला कुणी रोखू शकत नाही :प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगावला जाणारच, आम्हाला कुणी रोखू शकत नाही :प्रकाश आंबेडकर

अहमदनगर: येत्या १ जानेवारीला भीमा कोरेगावला विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आम्ही जाणारच आहोत. आम्हाला कुणी रोखू शकत नाही, असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज सांगितले. गेल्या वर्षी याच ठिकाणी १ जानेवारीला  दंगल पेटली होती आणि संपूर्ण राज्यभरात तिच्या ज्वाळा भडकल्या होत्या.

राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विजयस्तंभाजवळ कुणालाही सभा घेऊ दिली जाणार नाही, असे नुकतेच म्हटले आहे. आज आंबेडकर नगर दौऱ्यावर आले असताना त्यांनी कांबळे यांचे नाव न घेता आम्हाला कुणी रोखू शकत नाही, असे वक्तव्य केले. आम्हाला रोखण्याची भाषा करणारा सामाजिक न्यायमंत्री बिनडोक आहे. राखीव जागांवरील भुंकणारी कुत्री आहे. त्यांना सांगितले तेवढेच काम ते करत असतात, अशी टीका आंबेडकर यांनी केली.

मराठा आरक्षणाबाबत ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने ओबीसी समाज अस्वस्थ आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यात भविष्यात भांडणे होतील, असेही भाकित त्यांनी वर्तवले. मराठ्यांनी ओबीसींचे  आधीचे २७ टक्के आणि नंतर १६ टक्के असे आरक्षण मिळवल्याची भावना ओबीसींची झाली आहे. मराठा समाजाला मागास ठरवणारा गायकवाड समितीचा अहवाल जाहीर केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.देशात आज भाजपविरोधात वातावरण असून आज निवडणुका झाल्यास भाजपला दोनशेपेक्षा कमी जागा मिळतील, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. राफेल प्रकरणात सरकारने सर्वोच्च न्यायालयात चुकीची माहिती दिली आहे, असा आरोप त्यांनी केला.

Previous articleपुण्याची जागा कॉंग्रेस लढणार ; राष्ट्रवादीची माघार
Next articleनागरिकांच्या व्यक्तीस्वातंत्र्यांवर घाला घालण्याचा सरकारचा प्रयत्न :  चव्हाण