शिवसेनेचे राज्य आणणार म्हणजे आणणारच : उध्दव ठाकरे

शिवसेनेचे राज्य आणणार म्हणजे आणणारच : उध्दव ठाकरे

पंढरपुर :  राज्यात शिवसेनेचे राज्य आणणार म्हणजे आणणारच असा आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पंढरपुर येथे झालेल्या विराट सभेत व्यक्त केला. महासभेला संबोधित करताना शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. आपल्या भाषणात त्यांनी पीकविमा घोटाळा, राम मंदिर कर्जमाफी, राफेल घोटाळ्यावरुन भाजपावर निशाणा साधला. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणूकीवरून त्यांनी भाजपाची खरपुस समाचार घेतला.शिवेसेनेच्या आजच्या या सभेला ऐतिहासिक गर्दी झाली होती.

शिवसेनेने पंढरपुरात आयोजित केलेल्या महासभेला जनसागर लोटला होता.आयोध्या दौ-यानंतर सर्वांचे लक्ष लागलेल्या आजच्या पंढरपुरच्या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोरदार शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला. आपल्या भाषणात शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रामुख्याने भाजप आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. युती होणार का या फालतू चर्चेत मी जात नाही असे सांगतानाच  शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा अशी मागणी त्यांनी केली.युती करायची किंवा नाही याचा निर्णय जनताच घेईल असेही त्यांनी आपल्या भाषणात सांगिल्याने आगामी निवडणूकीत युती होणार किंवा नाही यावर प्रश्न चिन्ह कायम आहे.नुकत्याच झालेल्या पाच राज्याच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी छत्तीसगडमधल्या आदिवासी समाजाचे , मिझोराम आणि तेलंगाणातील प्रादेशिक पक्षांचे कौतुक केले.येथिल जनतेने पर्यायाचा विचार न करता घरात झालेली घाण साफ करतो म्हणून मतदान केले.आम्ही जगज्जेते आहोत या भ्रमात असणा-यांच्या  ठीकऱ्या उडवल्या असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठा समाजाप्रमाणेत धनगर माहदेव कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी मी रस्त्यावर उतरणार असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मला सभेपूर्वी सांगितले की या मैदानात सभा घेण्याचे धाडस कोणी करत नाही.तेव्हाच मी ठरवले की सभा घ्यायची ती यात मैदानात असे सांगतानाच, शरयूनंतर बरोबर एक महिन्यानंतर पंढरीत विठ्ठलाच्या चरणी नम्रपणाने लीन होऊन चंद्रभागेच्या तीरावर आलो आहे.मी थापा मारत नाही, जे बोलतो ते मी करून दाखवतो असे सांगत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. पंतप्रधान तुम्हा जगभर फिरताय एकदा आमच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात येऊन जा असे आवाहन करतानाच जानेवारीमध्ये संपूर्ण दुष्काळग्रस्त महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याची घोषणा उध्दव ठाकरे यांनी केली.राम मंदिर बांधणार म्हणजे, बांधणारच. मी अयोध्येला कुंभकर्णाला जागं करण्यासाठी गेलो होतो.कुंभकर्ण झोपून राहिला, तो उठलाच नाही नाही तर पेटलेला हिंदू कुंभकर्णा तुझी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.मी वाराणसीत जाईन सुद्धा, संपूर्ण देशात फिरेन असे सांगून ,कुंभकर्ण झोपला असला तरी हिंदू झोपलेला नाही.पंढरपुरातही झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी आलो आहे असे त्यांनी ठणकावले.

ठाकरेंनी आपल्या भाषणात स्थानिक मुद्यांना हात घालताना, शेतकरी हा काही मल्ल्या, मोदी नाही अशी टीका केली.गोरगरिबांना नाडण्याचा प्रयत्न केलात तर त्याची गाठ शिवसेनेशी आहे हे लक्षात ठेवा अशा इशारा त्यांनी देत.गावागावातील शिवसेनेच्या शाखा, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आधाराचे केंद्र बनेल असे सांगून,शिवसेना निवडणुका बाजूला ठेवून गोरगरिब, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे असे सांगितले.आम्हाला जागावाटपात स्वारस्य नाही, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहीजे असेही त्यांनी सरकारला ठणकावले. देवांच्या नावाने जुमला केलात तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही असे सुनावत राम मंदिराचामुद्दा सोडणार नाही, सुटू देणार नाही,महाराष्ट्रावरचे संकट टाळण्यासाठी पांडुरंग पाहिजे, दुष्काळनिवारणासाठी पांडुरंग पाहिजे, तर मग मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडा, पांडुरंगच तिथे बसेल असे सांगत शिवसेनेचे राज्य आणणार म्हणजे, आणणारच असा विस्वास व्यक्त करीत छत्तीसगडमधल्या लोकांनी घाण पहिले साफ केली, तसे धाडस मला शिवरायांच्या महाराष्ट्राकडून अपेक्षित आहे असे ठाकरे म्हणाले.

Previous articleमुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हावा हीच इच्छा : राऊत
Next articleगिरणी कामगारांना विविध घरकूल योजनेतून घरे देणार