पंकजा मुंडेंची बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामाला ‘सरप्राईज व्हिजीट’

मुंबई नगरी टीम

कडा : राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज परळी-बीड-नगर रेल्वे मार्गाच्या कामाला ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्याबरोबरच जिल्हा वासियांचे गेल्या कित्येक वर्षांपासूनचे स्वप्न पुर्णत्वास येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

 मुख्यमंत्री ग्राम सडक योजना व इतर विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण करण्यासाठी ना. पंकजाताई मुंडे आज कडा येथे आल्या होत्या. ज्याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, तेथून अगदी जवळच रेल्वे मार्गाचे काम सुरू होते, त्यांनी अचानक आपला मोर्चा तिकडे वळवला आणि रेल्वे मार्गाच्या कामाची पाहणी केली. रेल्वे मार्गाचे काम सध्या जलदगतीने सुरू आहे. हा प्रकल्प जिल्हयासाठी ऐतिहासिक आहे, लवकरच नगर ते कडा रेल्वे चाचणी होणार आहे. रेल्वे विभागाकडून चाचणीची तयारी सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आ. भीमराव धोंडे, आ. सुरेश धस हे यावेळी उपस्थित होते.

Previous articleआदिवासी शेतकरी-शेतमजुरांचे ३६१ कोटींचे खावटी कर्ज माफ
Next articleमी बारामतीतूनच लोकसभा निवडणूक लढवणार: जानकर