मुंबई नगरी टीम
घोटी : छगन भुजबळ शेळीसारखा कधीही जगणार नाही. जगेल तो वाघासारखाच अशा इशारा देतानाच माझ्या छातीत सहा महिने कळ आली नाही असे काही ट्रोलींग सुरु आहे. मी म्हणतो माझ्या छातीत कळ आली नाही परंतु माझ्या भाषणाने तुमच्या छातीत कळा का यायला लागल्या आहेत अशा शब्दात ट्रोलींगच्या बातम्यांचा समाचार आपल्या खास शैलीत आमदार छगन भुजबळ यांनी घोटी येथील जाहीर सभेत घेतला.
ओबीसींच्या मतांसाठी भाजप सरकार ७०० कोटींचा निधी जाहीर करतेय अरे घरी बसण्याची तुमची वेळ आली आहे मग ७०० कोटी रुपये देणार कुठुन असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी येथील जाहीर सभेत केला.ओबीसींचे आरक्षण रद्द करण्यासाठी कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. ओबीसींचे आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न यांचा आहे. अहो ९ न्यायाधीशांच्या खंडपीठाने ओबीसींचे आरक्षण दिले आहे असे सांगतानाच आज ओबीसींचे १७ टक्के आरक्षण राहिले आहे. तर ९ टक्केच नोकर्यांमध्ये आरक्षण भरलेले आहे अशी माहितीही भुजबळ यांनी दिली.सवर्णांना १० टक्के आरक्षण जाहीर केले आहे. परंतु हे आरक्षण कोर्टात टिकेल की नाही याबाबत शंका आहे. यांना साडेचार वर्षांत सूचलं नाही. परंतु पाच राज्यात फटका बसल्यावर ज्याला पाहिजे ते द्यायला हे सरकार तयार झाले आहे अशी टीकाही छगन भुजबळ यांनी केली.
© Mumbai Nagri Designed by
Tushar Bhambare +91 9579794143