पुलवामा दहशतवादी हल्ला पुर्वनियोजित : शरद पवार 

मुंबई नगरी टीम

बारामती :  कडेकोट बंदोबस्त असताना आणि हल्ल्यात नुकसान न होणाऱ्या गाड्या असतानाही हल्ला केला जातो याचा अर्थ हा पुर्वनियोजित कट होता हे सिध्द होते असा प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी करतानाच संपुर्ण देश जवानांसोबत असल्याचे सांगितले.

पुलवामा येथे काल जवानांच्या गाडीवर दहशतवादी हल्ला झाला. त्यात ४० जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी बोलताना या हल्ल्याचा निषेध करतानाच नाराजीही व्यक्त केली.सुरुवातीला हल्ला झाला आणि नंतर गोळीबारही करण्यात आला याचा अर्थ काही दहशतवादी लपून बसले होते. ज्याप्रकारे खबरदारी घ्यायला हवी होती ती खबरदारी घेतली गेली नसावी अशी शंका यानिमित्ताने समोर येत असल्याचेही पवार म्हणाले.

पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या आपल्या जवानांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आदरांजली वाहण्यात आली आहे. उरी हल्ल्यानंतर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असून यामध्ये आपल्या जवानांना प्राण गमवावे लागले आहेत.देशभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध केला जात असून राष्ट्रवादीनेही या हल्ल्याचा निषेध करतानाच आपल्या जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे.

Previous articleमहाराष्ट्रातल्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत
Next articleमुख्यमंत्र्यांचे हेलिकाँप्टर तासगावजवळ भरकटले